जरि या पुसून गेल्या,Jari Ya Pusun Gelya

जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे

त्या बावऱ्या कळीने ते स्वप्न पाहिलेले
वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले
छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे

ते श्वास कापरे अन्‌ आभास सावल्यांचे
रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे
अन्‌ सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे

नाही विचार केला, मी पाहिले न मागे
आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे
का घालिता उडी ही घर आठवे कुणा रे?

मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा
चुरडे कळी मनाची हा खेळ प्राक्तनाचा
स्वप्ने विरुन येते हातात वंचना रे


हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे
वेडी तुझी कळी ही बघते वळून मागे
का पापण्यांत मिटते निःशब्द वेदना रे ?

1 comment: