जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
नव्हत्या माहित मज वेडीला जन्मांतरीच्या गाठी
मनात आला विनोद केवळ
बोलुन गेले काही अवखळ
ओठी होती अल्लड बोली, आतुरता पोटी
चुरगळली हिरवी पाने
सहजपणाने, अज्ञानाने
आज उमटली लालस मेंदी तळहाती बोटी
परिहासाची विसर बोलणी
आठव होते काय लोचनी
परिचय झाला प्रणयासाठी, परिणय मग शेवटी
No comments:
Post a Comment