जनता येथे राज्य करी,Janata Yethe Rajya Kari

हरिचे प्यारे हरिजन सारे समतेच्या मंदिरी
कुणी न मालक, कुणी न सेवक
जनता येथे राज्य करी

गगनभेदी उंच हवेली
तिथेच काही दीन झोपडी
शाल पांघरुन धनिक झोपतो
वस्त्राविण ही गरिबी उघडी

धनिक न कोणी, गरीब न कोणी, एक चूल ती घरोघरी

प्रत्येकाचे नाव प्रभू तो
कणाकणावर सदैव लिहितो
ज्याचे त्याला कण ते मिळता
कोण उपाशी कसा राहतो ?
कुणी न उपाशी, कुणी न अधाशी, नसेल जेथे कुणी भिकारी

मायपित्याचे दर्शन घ्याया
वंचित झालो आम्ही लेकरे
बंधमुक्त ही त्यास कराया
एकजुटीने चला चला रे
आम्ही न साधु, आम्ही न भोंदु, सत्यशांतीचे आम्ही पुजारी

No comments:

Post a Comment