पहाट झाली उद्यानातुन मंदिरी ये गारवा,
जळते मी हा जळे दिवा
वचन देऊनी नाही आले
रातभरी मी रडून जागले
सुकली वेणी सुकला मरवा
युद्धावीण हो रणी पराजीत
रुद्ध मनोरथ निराश मन्मथ
आणा चंदन उरी सारवा
ज्योत फिकटली हो अरुणोदय
पुरूष प्रणय हा केवळ अभिनय
स्त्री हृदयाची त्यास न परवा
शृंगाराचा लाथडुनी घट
गोकुळातला गेला खट-नट
स्मृती तरि ग माझी हरवा
No comments:
Post a Comment