घुमला हृदयी नाद हा,Ghumala Hridayi Naad Ha

घुमला हृदयी नाद हा !
झन झन झन झरत नाद, झरत नाद हा
घुमला हृदयी नाद हा !

मी मनमोर बावरी
घे गुंफुनि घे मजला करी
मिठी मध्ये घे रे तू सत्वरी
मज मिठीत घे असा श्रीहरी
जडू दे मदनबाधा
घुमला हृदयी नाद हा !

किती छळिसी मला रे सजणा
जरी सरला तरुणपणा
किती छळिसी मला रे सजणा
खडा बसला घड्यावर ना
करु नको रे खुणा, पुन्हा पुन्हा

हलव जरा गगन तुरे हळुच प्रिया रे
करुनि असा अलगदसा फुलव जरा रे
हलव जरा गगन तुरे
सुखवि मला मद भरल्या तव नजरा रे
रोज रोज स्पर्श हाच भास तो नवा

दाटली सावली झोंबतो गारवा
कुंतली माळिला प्रीतीचा मारवा
श्वास हा रे तुझा भासतो पारवा
पापणित उमटु दे पडसाद हा.No comments:

Post a Comment