घेई घेई माझे वाचे,Ghei Ghei Majhe Vache

घेई घेई माझे वाचे ।
गोड नाम विठोबाचें ॥१॥

तुम्ही घ्या रे डोळे सुख ।
पाहा विठ्ठोबाचें मुख ॥२॥

तुम्ही ऐका रे कान ।
मना तेथें धांव घेई |

राहें विठ्ठोबाचे पायी ॥४॥

रूपी गुंतले लोचन |
पायी स्थिरावले मन ॥५॥

देहभाव हरपला |
तुज पाहता विठ्ठला ॥६॥

तुका म्हणे जीवा |
नको सोडूं या केशवा ॥७॥

No comments:

Post a Comment