नाही उणे कशाचे,
घर हीच राजधानी नाही उणे कशाचे
संसार साजिरा हा साम्राज्य हे सुखाचे
घर हीच राजधानी !
राजा उदार माझा मी तृप्त पट्टराणी
द्याया दुवा उभी ती पाठीस वृद्धवाणी
आयुष्य वर्धती ते उद्गार सार्थकाचे
दिनरात आकळे ना क्षण चांदण्यात न्हाती
वाटे हवेहवेसे ते सर्व येई हाती
औदार्य येथ नांदे त्या विश्वचालकाचे
साऱ्या फुलुन आशा, बहरास बाग आली
नि:श्वास-श्वास सारे स्वरधुंद राग झाले
भर त्यात अमृताची वच सानुल्या मुखाचे
No comments:
Post a Comment