घर असावे घरासारखे,Ghar Asave Gharasarakhe

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी

या घरट्यातुन पिलू उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती

No comments:

Post a Comment