डोंगरी शेत माझं ग Dongari Shet Majha Ga

डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती?

आलं वरीस राबून, मी मरू किती?



कवळाचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?

गवताचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?

आडाचं पाणी बाई ग, पाणी वडावं किती?

घरात तान्हा बाई ग, तान्हा रडंल किती?


तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?



आलं आलं वरीस जमीन नांगरून

उभं पीक नाचे सोन्यानं फुलवून

पर एक मेला सावकार कोल्हा

हिसकून घेतो बाई, सोन्याचा गोळा

उपाशी राहून ग, आम्ही मरावं किती?



म्हागाईनं बाई, घातला हैदोस

गळा आवळी बाई, बेकारी फास


कुनाचे देऊ आन कुनाचं ठेवू

अशीच वर्सावर वर्स जातील किती?



अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा

संसार वेलीच्या फुलवाया फुला

रूप नवं आणू महाराष्ट्र भूला

जुलमाचे काच रावणी फास, एकीचं निशाण हाती !

No comments:

Post a Comment