डोळ्यांत वाकुन बघतोस काय ?
जाळ्यात मासोळी गावायची नाय !
सोडून बसलास नजरंचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ
कसंबी झोक
गळाचं टोक
जिव्हारी माझ्या भिडायचं नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय ?
जाळ्यात मासोळी गावायची नाय !
रुपेरी पोट माझं रुपेरी कल्लं
रुपेरी शेपटीचं मारीन वल्हं
निळी निळी लाट
पाण्यातली वाट
माझ्याबिगर तुला ठावीच नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय ?
जाळ्यात मासोळी गावायची नाय !
सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळा मी देईन दडी
कुठवर बसशिल
चेटूक करशिल
मंतर असला चालायचा नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय ?
जाळ्यात मासोळी गावायची नाय !
No comments:
Post a Comment