डोळ्यांत वाच माझ्या Dolyat Vach Majhya

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे

साजाविना कळावे संगीत लोचनांचे !



मी वाचले मनी ते, फुलली मनात आशा

सांगावया तुला ते नाही जगात भाषा !

हितगूज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे




हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही

कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही

दोघांस गुंतवीती, म‍उ बंध रेशमाचे



पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या

या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या !

गंधात धुंद वारा, वाऱ्यात गंध नाचे

No comments:

Post a Comment