डोळ्यापुढे दिसे जे मज Dolyapudhe Dise Je Maj

डोळ्यापुढे दिसे जे मज चित्र ते सजीव

माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचीव



ही, एक आस होती हृदयात एकमेव

डोळ्यापुढे दिसे रे मज चित्र ते सजीव



कोलाहली जगाच्या घरकुल आपुले हे


'सोलीव' शांततेचे मंदिर सानुले गे

मी येथली पुजारी, तू पूजनीय देव



गीतासवे तुझ्या, गेही प्रभात व्हावी

खाद्या रुचि सुधेची, हाते तुझ्याच यावी

वाहीन देह देवा, वाहीन जीवभाव



दिन सोनियात न्हावा, रजतात रातराणी

आनंद तोच यावा, लेवून बाललेणी

'साकार' ये समोरी, स्वप्नात हीच शीव

No comments:

Post a Comment