डोळे मोडित गौळण राधा
हिला जडली मोहन बाधा
भाळल्या कितीक गौळणी
राधिका कोर चांदणी
बाल मुकुंद राजस गुणी
कसे बाई लाविले नादा
किती बाई काळा काळा
दिसे अचुकच कान्हा डोळा
वरपांगी भाव ग भोळा
नाही नंदलाल हा साधा
मुरलीची करी ग पिचकारी
रंगवी हरी ब्रिज नारी
लाजता हसे गिरीधारी
रंगात रंगली राधा
No comments:
Post a Comment