चिमुकले घरकुल अपुले,Chimukale Gharakul Apule

चिमुकले घरकुल अपुले छान
शांती सुखाचे वाटे अविरत, गाती येथे गान

किरण उषेचे पहिल्या प्रहरी

तोरण झळके पुढच्या दारी
दारी मागल्या रम्य सुमंगल, संध्येचे वरदान

लाली लाल गुलमोहर फुलतो

ग्रीष्माचा कटु ताप हरवितो
गारवेलीवर किती पाखरे, घेती गुंगूनी तान

जगावेगळे जग हे इथले
दोन जीव हे जेथे रमले
ह्या विश्वाचा तू निर्माता, म्हणुनी तुझा अभिमान

No comments:

Post a Comment