चल ग सखे चल ग सखे पंढरीला
तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला
चंद्र्भागा नदी-तीरावर
मंदीर विठ्ठलाचे सुंदर
देव आहे उभा वीटेवर
ठेऊनी दोन्ही कर कटेवर
ते पाहू त्यांचे रूप, लावू ऊद आणि धूप
करु वंदन प्रभूच्या मूर्तीला
देवाच्या दारी कुणा ना बंदी
दु:खि पीडित होती आनंदी
दुर्जन होती भक्तीचे छंदी
आली चालून छान ही संधी
तू दे हातात हात, उद्या चल ग धरु वाट
पाहू डोळे भरूनी जगजेठीला
वाली गरिबांचा पंढरपूरात
दर्शन घेऊ जोडूनी हात
तो देईल संकटी साथ
नांदू संसारी दोघे सुखात
तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार
आज दत्तात्रयाच्या वाणीला
No comments:
Post a Comment