उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
दऱ्या-दऱ्यात नाचती गात यक्षकिन्नरी
अचल ध्यान हे तुझे, मला न आज पाहवे
जिवा-शिवांत दूरता, मला न आज साहवे
ऊठ चंद्रशेखरा, करास या धरी करी
पहा प्रसन्न पद्मिनी जलाशयात डुंबिती
नील कमलिनीस त्या राजहंस चुंबिती
अधीर आस माझिया, थरथरे मनी उरी
No comments:
Post a Comment