उघडी द्वार पूर्वदिशा नारायण आले,
उजाडले !
भूमिपाल चालला धरतीच्या पूजना
शिंपडी सडा सजवी सुवासिनी अंगणा
वसुंधरेचे हास्य झळकले,
उजाडले !
गंगेवर तेजाचा पाऊस झिमझिमता
पर्णावर मोत्यांचे दवबिंदु लखलखता
गंधवतीने रंग उधळिले,
उजाडले !
पूजीत कुलदेवा महेशा
येई फुलवीत मनीची आशा
सुखवी घरदार घेऊनी त्या
जीव जिवाचा जगवीता
No comments:
Post a Comment