उघडा दार घराचे, उघडा दार मनाचे
आत्मारामा जागे करुनी काम करा रे पुण्याचे
उघडा दर घराचे, उघडा दार मनाचे
अंधाराचा चोर पकडण्या, सूर्य-शिपाई आला
माणसातला चोर कशाने दिवस-उजेडी भ्याला
मुक्ति अशाने मिळते का रे रांजण भरता पापाचे
काल रात्रि तू पाप माणसा असशिल काही केले
वेळ असे ही अनुतापाची पातक जाई धुतले
सोनसकाळी कामा लागुन सोने कर तू जन्माचे
नफा आणखी तोटा यांचे गणित चालते जेथे
मंदिर कसले दुकान हे तर ढोंग विक्रिला येथे
हृदय शोधुनी पाही वेड्या आसन ते रे देवाचे
No comments:
Post a Comment