कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेशी, तरी ओळखीचे डोळे
माती कोठल्या धरेची, त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती, त्याच्या उरात साठली
आणि कोठले आकाश, त्याने सर्वांगा माखले ?
कुठे पिऊन घेतले, त्याने मेघातले जळ
दिली वाऱ्याने कोठल्या, त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे, कुण्या जन्मीचे भेटले !
माझ्या ओंजळीचे झाले, मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया, ओला काजळ पाऊस
माझे मन त्याच्यासाठी, फांदी होऊनिया झुले !
No comments:
Post a Comment