कोकिळ कुहुकुहु बोले
तू माझा, तुझी मी झाले
ऋतुराजा तुझी वासंती
तरुतळी इथे एकांती
करकोमल देता हाती
चांदण्यात दिवसा न्हाले
मोहरुन डहाळी वरती
आपुली हिंदोलत प्रीती
निर्झरात टिपण्या मोती
पाखरु जीवाचे आले
तू येता सखया जवळी
फुलवेल तरुला कवळी
मधुमरंद भरतो कमळी
अंतरात मिटता डोळे
No comments:
Post a Comment