कशि या त्यजू पदाला,Kashi Ya Tyaju Padala

कशि या त्यजू पदाला ।
मम सुभगशुपदाला ॥

वसे पदयुग जिथे हे ।
मम स्वर्ग तेथ राहे ।

स्वर्लोकि चरण हे नसती ।
तरि मजसि निरयवसती ती ॥

नरकही घोर सहकांता ।
हो स्वर्ग मला आता ॥

No comments:

Post a Comment