कशी तुज समजावू सांग,Kashi Tuj Samajavu Sang

कशी तुज समजावू सांग
का भामिनी उगिच राग ?

हास्याहुन मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?

चाफेकळी केवी फुले
ओष्ठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पळे
का प्रसन्न वदन राग ?

वृत्तींचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवुनिया निर्विकल्प
अक्षय करु यज्ञ-याग

ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंध
हृदयांचे मधु प्रयागNo comments:

Post a Comment