कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा, आणिक घरंदाज
करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला देई साथ घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरीधायरी
जहरी बोलाचे हे जुळले तिरंदाज
होईल तेलवात स्नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादिप
वयात यौवनाचा विखुरला साज
No comments:
Post a Comment