कशी ही लाज गडे मुलखाची
ही वैरीण ग जन्माची
बोलू न देई येता कोणी
वरी उचले ना गडे पापणी
कसे बघावे सांग लोचनी प्रीतिभेट सुखाची
कशास द्यावा रुकार आधी
कळले मजला मी अपराधी
न मनावर घेऊ अगदी भाषा नजरचुकांची
चुकुनी एकदा मिळल्या नजरा
भावफुलांचा गुंफित गजरा
चूकभूलही आता विसरा खंत न परिणामांची
No comments:
Post a Comment