कशी रे आता जाऊ घरी,Kashi Re Aata Jau Ghari

कशी रे आता जाऊ घरी, सांग मला श्रीहरी
कशी मी आता जाऊ घरी रे ?

तव मुरलीने होता व्याकूळ

आले धावून निजता घरकूल
झाले गाता जागे गोकूळ तुझ्यासवे मी तरी

गूज निशेचे अजून नयनी
लपवू कसे बघ मिटे पापणी
ओळखिले रे दवबिंदूंनी या भिजल्या प्रहरी

राधा तव ही सासुरवाशिण
संसाराचे भवती रिंगण
भान न त्याचे तुझेच चिंतन करित राहिले ऊरी

No comments:

Post a Comment