कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?
अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, अहो चष्मेवाले तुम्ही
न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, फेटेवाले तुम्ही
सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?
काल म्हनं तुम्ही जत्रंला गेला, तमाशात काळिज इसरुन आला
खरं काय हो पाटील ?
इसरल्या ठायी, गावलं का न्हाई, आज तरि संगती आणलंय का ?
काल म्हनं तुम्ही तालुक्याला गेला, कमरंचा ऐवज हरवून आला
आरंरं
केली वाटमारी, सांजंच्या पारी, आज काय शिल्लक ऱ्हायलंय का ?
काल म्हनं तुम्ही हितं-तिथं गेला, बघता बघता घोटाळा झाला
आगं बया बया
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, खाली नका बघु आता लाजताय का ?
No comments:
Post a Comment