करु देत शृंगार,Karu Det Shringar

करु देत शृंगार, सख्यांनो करु देत शृंगार
अग्निवाचून आज करितसे राजपुती जोहार

जीवंत पति, मी सती जातसे
भाग्य लाभले कुणा कधी असे
मृदुल मृदुल तर या कमलाचा यज्ञी स्वाहाकर

ही भाग्याची वेळ साजणी
भांग भरा ग गुंफा वेणी
राजपुतीच्या नयनी का कधि दिसते अश्रूधार

मला न माहित कोण यवन तो
कोण जाणिते मृत्यु काय तो
हासत हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार