कर्म करिता ते निष्काम,Karm Karita Te Nishkam

कर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम

देह चंदनी देव्हारा आत आत्म्यासी निवारा
मन नसावे मळीन ते तो आत्म्याचे आसन
देह ईश्वराचे धाम मुखी राहो विठ्ठल नाम

घाम श्रमाचा गाळावा देह निगेने पाळावा

नको इंद्रियांचे लाड काम क्रोधाचे पवाड
पाळा नीतीचे नियम मुखी राहो विठ्ठल नाम

स्वये तरी दुसऱ्या तारी तरीच होई गा संसार
देह सेवेचे साधन देह वेचायाचे धन
श्रमी लाभतो विश्राम मुखी राहो विठ्ठल नाम



No comments:

Post a Comment