कमोदिनी काय जाणे,Kamodini Kaay Jane
कमोदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसें तुज ठावें नाही तुझें नाम ।
आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥२॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी ।
ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं ।
नाही त्याची भेटी भोग तीये ॥३॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment