काळ्या गढीच्या जुन्या, ओसाड भिंतीकडे
आलीस तू एकटी, बांधुन सारे चुडे.
काळ्या गढीच्या जुन्या, ओसाड भिंतीकडे
आलीस तू चोरटी, बांधुन सारे चुडे.
वारा किती मंद ग !
होते किती कुंद ग !
होता किती धुंद ग अंधार मागेपुढे !
काळी निनावी भिती
होती उभी भोवती;
वाटेत होते किती काटेकुटे अन् खडे
माझी तुझी चोरटी
जेव्हा मिळाली मिठी
हुंकारले खालती आडातले पारवे.
हुंकारला पारवा;
तेजाळला काजवा !
हालून गेला जरा काळोख चोहिकडे !
No comments:
Post a Comment