काळ देहासी आला खाऊ,Kaal Dehasi Aala Khau

काळ देहासी आला खाऊ ।
आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१॥

कोणे वेळे काय गाणे ।
हे तो भगवंता मी नेणे ॥२॥

टाळ मृदुंग दक्षिणेकडे ।
माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥

नामा म्हणे बा केशवा ।
जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥



1 comment:

  1. हो बरोबर आहे आपण आज जे जगतो आहे ते काळा संगे जगात आहे एक एक क्षण हा काळ आपला टिपत आहे

    ReplyDelete