कळी कळी उमलते पाकळी फुलून ये आनंद
आनंदाच्या लहरी वरती जीव नाचतो धुंद
एक अनोखी आली चाहूल, भूमिवरचे सुटले पाऊल
स्वैर भरारे प्राण अंबरे तोडुन सारे बंध
उरी जागले नव संवेदन, कंप सुखाचे अंगाअंगातुन
हृदयाचे राजीव उमलले टपटपतो मकरंद
उगिच लाजते उगीच रुसते, मी माझ्याशी उगीच हसते
न कळे बाई काय खुळा हा मला लागला छंद
No comments:
Post a Comment