कधीतरी तुम्ही यावे इथे या घरात
कैक दिवस होता हेतू, असा अंतरात
शपथ तुमची, शपथ तुमची !
आज भाग्य आले हाती, तरी उरी वाटे भिती
मनातले हितगूज सारे राहिले मनात
शपथ तुमची, शपथ तुमची!
जीव बावरे हा भोळा, नीर दाटू पाहे डोळा
बोल बोल ओठावरचा विरघळे मुखात
शपथ तुमची, शपथ तुमची !
मनी गुंफिलेल्या ओळी, ओघळल्या ऐत्यावेळी
सूर मात्र केवळ उरले गीत गायनात
शपथ तुमची, शपथ तुमची !
शपथ तुम्हा तुमची देवा, मूक भाव जाणून घ्यावा
पुन्हा नका लोटू मजसी स्वप्न चिंतनात
शपथ तुमची, शपथ तुमची !
No comments:
Post a Comment