कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी, पाहशील का ?
तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा, वाहशील का ?
रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी राहशील का?
तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही साहशील का?
No comments:
Post a Comment