कन्या सासुऱ्याशीं जाये,Kanyaa Sasuryashi Jaye

कन्या सासुऱ्यासीं जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥

तैसें जालें माझ्या जिवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥


चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥

जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी ॥४॥

No comments:

Post a Comment