कधी मी पाहीन ती पाऊले,Kadhi Mi Pahin Ti Paule

सामर्थ्याहून समर्थ निष्ठा, अशक्य तिजसी काय ?
पडे अहल्या शिळा, त्यास्थळी येतील प्रभूचे पाय !
कधी मी पाहीन ती पाऊले ?

पाहिन केव्हा तो सोहळा
प्रभू चरणांचा स्पर्ष कपाळा
आनंदाश्रू झरतील डोळा
भाग्यच माझे दिसेल मजसी मूर्त उभे ठाकले !

रणात जिंकुन कौरवसेना
यश सिद्धीच्या करित गर्जना
अभये अर्पीत साधूसज्जना
पाच प्राणसे येतिल पांडव विजयाने न्हाले !

मारून रावण कपटी कामी
अशोकवनि या येतील स्वामी
वाहणार हे पदी प्राण मी
भेटीसाठी अशा अलौकीक कालचक्र थांबले !

देवाहूनहि समर्थ भक्ती
स्वरात माझ्या अमोघ शक्ती
सुफलित व्हाया माझी उक्ती
पंचकन्यका अर्पण करिती पुण्य मला आपले

No comments:

Post a Comment