काय करू मी ते सांगा,Kaay Karu Mi Te Sanga

काय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा

जगा आगळे हे कोडे, तुम्हां घालितो साकडे
आग मना अवघ्या अंगा, उभा पेटलो श्रीरंगा

बाप गेला, आई मेली, लोचने ना पाणावली
विवेकासी नाही जागा, आज भ्यायलो प्रसंगा

शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा आधी
काय म्हणावे भोगा, उलट वाहू पाहे गंगा