काय ग सखू,Kaay Ga Sakhu

काय ग सखू ?
बोला दाजिबा !

काय ग सखू, बोलू का नगू ,
घडिभर जरा थांबशील का ?

गोड गोड माझ्याशी बोलशील का ?

काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही !


येळच नाही ?
दाजिबा थांबायला येळच नाही !

डोईवर घेऊन तू चाललीस काई ?

डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या
तांब्यात दूध हाय गाईचं, घेता का दाजिबा वाईचं ?

काय ग सखू, रागावू नगू,
घडीभर जरा थांबशील का ?
थांबशील का ग, जातीस कुठं तू सांगशील का ?

रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं

वागणंच खोटं ?
पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं ?


पहाटेच्या पारी, घेऊन न्यारी, बाई लौकरी,
जाते मी पेरुच्या बागात, येऊ नका दजिबा रागात

काय ग सखू, घाबरू नगू
घडीभर जरा थांबशील का ?
मनात काय तुझ्या सांगशील का ?

सांगू कशी मी कस्‌कसं होतं
मनात माझ्या भलतंच येतं

काय ग सखू तुझ्या मनात येतं ?

दुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत, जायाचं का आंबराईत ?

चल चल सखू, चल ग सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा !No comments:

Post a Comment