का हो धरिला मजवर,Ka Ho Dharila Majavar

का हो धरिला मजवर राग ?

शेजाऱ्याच्या घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्नांना जाग

वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव, तुम्ही जाता पुढे

जाता चैतापरी माझी फुलवून बाग

जाणे येणे होते तुमचे माझ्या घरी, माझ्या घरी
तुमच्या पावलांनी वाट पडली परसूदारी
वाटतं फिरुन याल अवचित केव्हा तरी
डोळे न्याहाळती, खुळ्या प्रीतीचा माग



No comments:

Post a Comment