काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी कधि रे येशिल राजा
पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तात
तुफान आलं सुसाट माजा करून गेला घात
कातरवेळी करनी झाली हरवून गेला राजा
सुकली फुलांची शेज राया राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळ वाया श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी ये रे ये एकदा राजा
धनी जीवाचा तू मनाचा राया आधार तू
सपनात गाण्यात तूच माझ्या मनात प्राणात तू
चांदण्या राती माडाच्या साथी भेटेल जीवाचा राजा
No comments:
Post a Comment