असा मी काय केला गुन्हा
गेला सोडुनी मजसी कान्हा
गोकुळात मी रंगून गेले
मनोमनी तर खूप नाचले
मुरलीचा मी सूर जाहले
अजून हृदयी त्याच खुणा
सांज सकाळी झाल्या भेटी
तेव्हापासून श्यामच ओठी
यमुनाकाठी मीच एकटी
सोसू किती मी यातना
तुझ्या प्रितीची रीत निराळी
जीव लावुनी मनास जाळी
फसले रे मी राधा भोळी
सख्या मुकुंदा येई पुन्हा
No comments:
Post a Comment