गेला दर्यापार घरधनी, गेला दर्यापार
पुरती ओळख नव्हती झाली
अंगाची ना हळद निघाली
अजुनी नाही देवक उठलं
नाहि उतरला गौरीहार
पलटण घेउनि बोट चालली
परतुनि राया कधि येणार
संसाराची स्वप्ने माझी
अशीच का रे विरघळणार
डोळ्यांमधुनी गळती धारा
धीरहि सुटला पार
घरट्याभवती मूक पाखरू
असंच कुठवर भिरभिरणार
No comments:
Post a Comment