गंजल्या ओठास माझ्या धार,Ganjalya Othas Majhya Dhar

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !


पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू

तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे !No comments:

Post a Comment