गळ्याची शपथ तुला जिवलगा,
तुला जिवलगा
मुखी सुधेचा कलश लाविला
एकहि नाही घोट घेतला
नकोस घेऊ असा हिसकुनी
नकोस देऊ दगा
वेल प्रीतिची तूच लाविली
रुजली, फुटली, फुलूलागली
नको चुरगळू असा कठोरा
तूच राखिली निगा
तहान हरली भूकहि हरली
एकच आशा मनात उरली
पुन्हा बोल ती नाजुक भाषा
तूच जिवाचा सगा
No comments:
Post a Comment