गा गीत तू सतारी,Ga Geet Tu Satari

गा गीत तू सतारी, गा गीत आसवांचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे

किती रंग गंध हळवे, फुलती भल्या पहाटे
होता दुपार विरती, निमिषात सांज दाटे
काळोख पीत येती, स्वर मंद काजव्याचे

पंखात ऊब घेते, पिल्लू मुक्या खगाचे
चोचीत गोड दाणा घेण्यास जीव नाचे
पिल्लास पंख फुटता, घर शून्य पाखराचेटाक्यापरी सुईच्या स्वर आर्त छेदणारे
ते सांधती मनाचे आभाळ फाटणारे
गाण्यापरी जिण्याला, आकार भावनांचे

No comments:

Post a Comment