गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची
वेळ कडक नि बाराची, वाट बाई डोंगराची
पहिल्यानं गाडीत बसले मी आज
कोकणात आहे माहेर माझं
आईबाप माझं दर्याचं राजं
मला सवय बंदराची, वाट बाई डोंगराची
दणक्यावर दणका बसतो ग बाई
दणक्यानं जीव हा व्याकूळ होई
तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही
ह्या भयाण जंगलाची, वाट बाई डोंगराची
घरात वागे तशी दारात
रात्रीचा दिसं करी दिसाची रात
भारी उताविळ ही पुरुषाची जात
आहे लबाड मुलखाची, वाट बाई डोंगराची
समोर दिसतंय् आपुलं गाव
कसं वाटं ना तुम्हाला भ्यावं
पुरे पुरे आता भास्करराव
ओढाताणी ही पदराची, वाट बाई डोंगराची
No comments:
Post a Comment