गाडि आली गाडि आली,Gadi Aali Gadi Aali

गाडि आली गाडि आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंट वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

4 comments:

 1. सगळ्यात फालतू आणि बालिश, कोण आहे रे कवी, पाठवा त्याला इथं चांगलब तुडवला पाहिजे

  ReplyDelete
  Replies
  1. सॉरी माझा भाऊ काही पण लिहितो , सॉरी for the comment

   Delete
 2. सगळ्यात फालतू आणि बालिश, कोण आहे रे कवी, पाठवा त्याला इथं चांगलब तुडवला पाहिजे

  ReplyDelete
 3. मित्रा भेट मला

  ReplyDelete