गाव असा नि माणसं अशी,Gaav Asa Ni Manase Ashi

हल्या, संबाळ, हल्या
हे हे हल्या, संबाळ, हल्या !
गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी !

कुणी कुणाला जीव लावतंय्‌
पाड्तंय्‌ कोणी फशी !

गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी !

रूप कुणाचं बिलोरी ऐना
आली भरात माशुक मैना

वय वसंत चैताचा महिना
तरुणपणानं केली तिची दैना

काच अब्रुची फुटून गेली
डाग लागला तिशी

गाव असा नि माणसं अशी !

काय घडून गेलं मागं
कुठे रक्ताचं जुळलं धागं

नव्या अंगात झालं जागं
तेच नव्यानं वारसा सांगं

या गावाचा पोर कुणीसा
ताठ्यानं पिळतोय्‌ मिशी

गाव असा नि माणसं अशी !

अशी उमेद घेऊन आला
नाही गुमान कुणाची त्याला

उंच आभाळयेवढा झाला
केलं ठेंगणं समद्या गावाला

वादळवारा पहाड झेली
छाती त्याची तशी

गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी !

No comments:

Post a Comment