ग बाई बाई झोंबतो गारवा,Ga Bai Bai Jhombato Garava

चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल
दोन उशा रेशमी गरम लोकरी शाल
पर झोप नाही आली जागरण झालं काल
रंग महाली उब असून का काटा फुलतोय नवा
ग बाई बाई झोंबतो गारवा !

अंग नाजूक ग मला रुतली उशी
आली जांभई ग निजले बदलून कुशी
खिडकीमधुनी खुणवत होता चवथीचा चांदवा
ग बाई बाई झोंबतो गारवा !

रागारागानं गेले मी कोन्यात ग
चिंब न्हाऊन मी पाहिलं ऐन्यात ग
मनात माझ्या घुमु लागला मदनाचा पारवा
ग बाई बाई झोंबतो गारवा !

आज आला तुम्ही माझी केली कदर
झाली नजरानजर घेते लाजून पदर
खुशाल यावं जवळ घ्यावं धरून हात आडवा
ग बाई बाई झोंबतो गारवा !

No comments:

Post a Comment