अवेळीच केव्हा दाटला,Avelicha Kevha Datala

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर

एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली

तिच्या डोळियांत जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले

No comments:

Post a Comment